Sunday, 7 December 2014

असमाधानी

0 comments

                 असमाध‍नी

समाधानानी नेहमी जगण्याकरता
प्रत्येकजण धडपड करत असतो
समधानाचे समाधान होई पर्यत
पूर्ण जीवनच पणाला लावत असतो

समाधानाच्या फक्त नावाखाली
आपल्या गरजा वाढवत बसतो
मन‍ाविरूद्ध एखादे घडताच काही
निराशेमध्ये स्व:ताला ढकलून देतो

इतरांन पेक्षा खुप क‍ही जवळ असून
इतरांन पेक्ष‍ा  कमीच समजत असतो
आहे त्यात समाधान मानण्या पेक्षा
असमाधानातच नेहमी वावरत असतो

सुखाच्या मागे सतत धावता धावता
समाधानाची ओळख विसरुन जातो
जवळच्या सर्व सुख सोयींना सोडून
दु:खाच्या विळख्यात गुरफडत जातो

समाधान आणि माणसाचे नाते हे
मृगजळातल्या पाण्यासारखे असते
वास्तवातील प्रत्यक्ष सुखांना सोडून
कल्पनेतल्या दुनियेत भरकटत असते