Tuesday 16 December 2014

पेशावर १६/१२

0 comments

                     पेशावर १६/१२

वेळ होती अजुन कळ्यांना उमलायला
पंख ही फूटले नव्हते त्यांच्या स्वप्नांना
काय अपराध होता चिमूकल्या जीवांचा
सामना करावा लागला  दहशदवादाचा

वय होते त्यांचे खेळण्या बागडण्याचे
लपालपी अन चोर पोलिस खेळण्याचे
खोट्याखोट्या बंदूकीने खेळताखेळता
तांडव झाले मात्र ख-या खू-या गोळ्यांचे

पाट वाहत होते कोवळ्या रक्ताचे
आवज फक्त गोळ्या आणि रडण्याचे
रक्ताने माखलेला तो चिमुकला देह पाहुन
नाही पाझरले ह्वदय क्रूर दहशदवाद्यांचे

धर्माच्या नावानी दहशद पसरवणारे
विसरले विचार आपल्या आत्म्याचे
जीव घेऊन निष्पाप चिमुकल्यांचा
खून केला पवित्र माणूसकीचा

गोळ्या क्षणभर थांबल्या असतील
कोवळ्या देहास चिरत जाताना
काळीज कसे थरथरले नाही
दहशदवाद्यांना त्या चालवताना

देवा धर्माची ह्यांना भीती नसते
कोणीच ह्यांना नातलग नसतात
फक्त एकच अोळख असते ह्यांची
दहशदवादी दहशदवादी दहशदवादी. . . .

Sunday 7 December 2014

असमाधानी

0 comments

                 असमाध‍नी

समाधानानी नेहमी जगण्याकरता
प्रत्येकजण धडपड करत असतो
समधानाचे समाधान होई पर्यत
पूर्ण जीवनच पणाला लावत असतो

समाधानाच्या फक्त नावाखाली
आपल्या गरजा वाढवत बसतो
मन‍ाविरूद्ध एखादे घडताच काही
निराशेमध्ये स्व:ताला ढकलून देतो

इतरांन पेक्षा खुप क‍ही जवळ असून
इतरांन पेक्ष‍ा  कमीच समजत असतो
आहे त्यात समाधान मानण्या पेक्षा
असमाधानातच नेहमी वावरत असतो

सुखाच्या मागे सतत धावता धावता
समाधानाची ओळख विसरुन जातो
जवळच्या सर्व सुख सोयींना सोडून
दु:खाच्या विळख्यात गुरफडत जातो

समाधान आणि माणसाचे नाते हे
मृगजळातल्या पाण्यासारखे असते
वास्तवातील प्रत्यक्ष सुखांना सोडून
कल्पनेतल्या दुनियेत भरकटत असते

Thursday 4 December 2014

आयुष्य

0 comments

            आयुष्य

जीवनभराच्या प्रवासामध्ये
आयुष्य आपले घडत असते
निरनिर‌ाळे अनुभवा बरोबर
जीवन पुढे चालतच असते

सजीव असो वा निर्जिव असो
आयुष्य तर दोघांनाही असते
टिकून राहण्याची धडपड मात्र
प्रत्येकाची वेगवेगळी असते

सरळ आयुष्य जगण्यामंध्ये
जीवनात महत्वाचे काही नसते
जगाला दाखले देण्यासाठी
कणखर पणे मात्र जगावे लागते

आयुष्याच्या अखंड प्रवासात
खुप अशा काही गोष्टी घडतात
मनात नसताना देखिल त्यांना
जुळवून मात्र घ्याव्याच लागतात

आयुष्याला दिशा देण्यासाठी 
तडजोडींचा आसरा घ्यावा लागतो
येणे जाणे तर चालूच राहते
समधान त्यातच मानायचे असते

आयुष्यात खुप करायचे असते
काय करावे कळतच नसते
करायची जेव्हा वेळ येते
हातात तेव्हा काहीच नसते

Wednesday 19 November 2014

भेट तूझी नी माझी

0 comments

               पहिली भेट

सुर्यास्ताच्या रम्य संध्याकाळी
मावळतीला गुलाबी पसरलेली
रोमहर्षक अशा वातावरणात
तीची पहिली नजर भेट झाली

नजरा नजर ती क्षणिक होती
परी खुप काही सांगुन गेली
तीच्या डोळ्यातली ती चमक
ह्वदयच घायाळ करुनच गेली

मोकळे घनदाट तीच्या केसांना
बंधन नव्हते हवेशी खेळताना
कपाळावर झुलणा-या बटांतून
पाहिले तिला नजर चुकवताना

हळुच लाजत जेव्हा ती हसली
गालावर तीच्या खळी ऊमलली
मनात प्रितीची फुले फुलताना
ह्वदयाची मात्र धडधड वाढली

शब्द सुचत नव्हते बोलण्यासाठी
अबोलातच जुळत होत सर्वकाही
बोलण्याची काहीच गरज नव्हती
नजरच नजरेला सर्व सांगत होती

Friday 14 November 2014

ह्वदय

0 comments

                 ह्वदयाच्या गोष्टी

ह्वदयाबद्दल काय सांगावे
प्रत्येकाचे विचारच वेगळे
कोणा वाटते शरीराचा प्राण
कोणी म्हणतो प्रेमाचा आधार

डॉक्टरांच काय विचारुच नका
ह्वदयाच्या नावानी पैशावर डोळा
पेशी अन नसांच्या गुंतागंतीत
आजारांचा माडतात  बाजार

लेखकाचे काही वेगळेच असते
ह्वदयाची कल्पना भन्नाट असते
प्रम कादंबंरीत  रंगत आणताना
ह्वदयाचीच चोरी करायला लावते

तरुण तरुणीच्या प्रेम प्रकरणात
ह्वदयाला मिळतात अनेक आकार
भिंन्ती आणि वह्यांमध्ये रंगताना
कधी बदाम तर काधी पिंपळ पान

आई वडिलांच्या ह्वदयात मात्र
कुटूंबाची काळजी लपली असते
आपल्यावर संस्कार करण्यासाठी
कधी कठोर तर कधी हळवे असते

Thursday 13 November 2014

नात्यांची श्रीमंन्ती

0 comments

       नात्यांची श्रीमंन्ती

रस्त्याने एकदा चालता चालता
विलक्षण दृष्य पाहिले कडेला
दोन असह्य चिमुकल्या जिवांना
पाहिले निर्सगाशी झुंज देताना

कडाक्याची बोचरी थंडी होती
शरिराला ती गोठवत होती
फाटलेल्या एका कपड्यामंध्ये
एकमेकींना त्या बिलगुन होत्या

थरथरत्या घट्ट मीठीमंध्ये
एकमेकींना त्या सावरत होत्या
नात्यातील आपल्या अतुट प्रेमाची
जाणीव जणू मला करुन देत होत्या

मळलेल्या त्यांच्या शरिरातले
मन मात्र स्वच्छ दिसत होते
दारिद्र्यातील ती अतुट नाती
श्रीमंन्तीला ही लाजवीत होती

जरी असलो श्रीमंन्त आपण
नात्यांनी मात्र गरीबच असतो
हेव्यादाव्याच्या जगात आपण
माया ममताच विसरुन जातो

पाठ स्वच्छतेचा

0 comments

                      पाठ स्वच्छतेचा

प्रचीन काळात पुर्वजांनी
सांगितली महती स्वच्छतेची
रोगराईच्या निर्मुलासाठीच
गरज आहे आता ती काळाची

घरादार स्वच्छ ठेवण्यासाठी
भिती मनी दाखवली लक्ष्मीची
परिसराला सुंदर ठेवण्यास
निर्मिती केली बाग बगिचांची

वंर्षान मागुन वर्ष सरत गेली
गर्दी वाढत गेली माणसांची
स्वच्छतेला कमी लेखल्याने
गिळले रोग राईचा राक्षसाने

समाजाला जागृत करणे
गरज आहे आता काळाची
प्रत्येकाचे  कर्तव्य आहे
परिसर स्वच्छ ठेवण्याचे

चला करुया सूरवात आपणच
स्वच्छतेच्या चांगल्या कामाची
जगतामंध्ये शान राखूया
उज्वल भारतीय संस्कृतीची

Wednesday 12 November 2014

संसार

0 comments

                      संसार

संसार म्हणजे दोन जिवांचा मेळ
खेळावा लागतो मजेशीर खेळ
तूझे माझे करणारे होतात इथे बाद
समजदार पडतात एकमेकाच्या प्रेमात

कधी रुसवा तर कधी नाराजी
हिच संसारातील खरी ताजगी
संशयाला इथे नसतो थारा
विश्वासाला मान असतो मोठा

संसाराचा ताण दोघांना ही असतो
तकरारीचा सुर मात्र कोणाचाच नसतो
एकमेकांचा भार  सांवरता सावरता
नकळत घट्ट होतो नात्यांचा जिव्हाळा

गोडी गुलाबीच्या या वातावर्णात
नकळत वर्ष जातात सरुन
जिवनातल्या उतरणीला
असतात एकमेकांचा  हात धरुन

Monday 10 November 2014

शिक्षण

0 comments

             शिक्षण

आयुष्याला घडवण्याला
शिक्षणाचीच साथ असते
जन्मा पासून मृत्यु पर्यत
शिकवणी ही चालुच असते

आई बाबांच्या मार्गदर्शनाने
पहिले पाऊल टाकले जाते
ख-या अर्थाने पाहिले तर
शिक्षण तेव्हाच सुरु होते

पाठ्य पुस्तकातून शिकताना
समाज ही शिकवण देत असतो
सृष्टीचे नियम पाळण्यासाठी
निसर्ग ही पाठ शिकवत असतो

शिक्षणाच्या पवित्र साथीने
उंचच उंच शिखर गाठता येते
शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी
बहिणाई ही ओव्या बोलत असते

वेगवगळ्या लोकात वावरताना
आपणच आपले शिकायचे असते
अनुभवातून शिकण्यासाठी
जगात कोणतीच शाळा नसते

जिवनभराच्या शिक्षणाला
संस्काराची जोड द्यायची असते
शिकवण देणा-या माता पित्याचे
सुशिक्षित पणे ऋण फेडायचे असते

Thursday 16 October 2014

स्वभाव

0 comments

                             
             स्वभाव

माणसा माणसात फरक असतो
प्रत्येकाचा आपला स्वभाव असतो
कोणाला तो आवडणारा असतो
तर कोणाला नावडणारा असतो

मनामनात तो लपलेला असतो
समजायला आपला कस लागतो
कधी धुर्त कधी तो कपटी असतो
काहींचा तर थागपत्ताच नसतो

स्वभाव हा विचित्रच असतो
प्रत्येक वेळी बदलत असतो
परिस्थिती बदलण्यामंध्ये
त्याचाच मोठा वाटा असतो

स्वभावाला आहेत नाव बरीच
वागुणूकच त्याला कारणीभूत
बदलण्यासाठी खुप झटतात
यशस्वी मात्र मोजकीच होतात

भिन्न स्वभावाचे असून सुद्धा
एकत्र आपण राहत असतो
भांडन तंटा टाळण्यासाठी
स्वभावाचचे कारण पुढे करतो

Wednesday 2 July 2014

पाऊस

0 comments

           पाऊस               

पावसाच्या सरी बरसताना
थंडथंड धुंद वातावरणात
पाऊस अंगावर झेलताना
बघ माझी आठवण येते का

तूफानी पावसात फिरताना
पावसाची मजा लुटताना
छत्रीमंध्ये एकटीच भिजताना
बघ माझी आठवण येते का

झाडाचा आडोसा घेताना
ऒळखीचा चेहरा शोधताना
आधारासाठी नजर फिरताना
बघ माझी आठवण येते का

रात्रीच्या मिट्ट काळोखात
मनाच्या खोल कोप-यात
पावसाच्या आठवणी साठवताना
बघ माझी आठवण येते का

Wednesday 4 June 2014

विचार

0 comments
जीवनातील या प्रवासात
विचारांचा असे भारी थाट
नको नको म्हणून सुंध्दा
डोक्यामंध्ये घालतात घाट

कधी असतात घरातल्यांचे
असतात कधी बाहेरच्यांचे
काही मनाला चिटकून राहतात
काही ऊगाचच येऊन जातात

विचारांच्या चक्रिवादळात
जीवन नौका भरकटून जाते
किनारा शोधता शोधता
आयुष्यच सारे निघून जाते

विचारांनाच्या संस्कारांना
सुविचारांची असते साथ 
अविचारांच्या घराला फक्त
तिरस्करांचे कुंपण असते

विचारांना ही मर्यादा असतात
नियमांच्या ही बेड्या असतात
तोडल्यातर विनाश असतो
पाळल्यातर विकास होतो

भूतकाळांतल्या विचारांने
भविष्याची काळजी वाटते
वर्तमानामंध्ये जगण्यासाठी
आयुष्यच पणाला लागते

विचारांचे काही वेगळेच असते
समजण्याच्या पलिकडे असते
इतरांचे ते वाईट दिसतात
आपले मात्र चांगले वाटतात





Wednesday 19 March 2014

आला वसंत

0 comments

                        आला वसंत

चाहूल लागताच वसंताची
कात टाकली निसर्गाने
जुनी पालवी गेली झडून
नविंन फुटली चैत्यन्यानी

वंड फुलले पिंपळ फुलले
आंबा मोहरला सुगंधाने
मकरंदाच्या वेडापायी
चालली लगबघ मधमाशांची

लाल पिवळे निळे गुलाबी
रंग उधळले सर्व दिशांनी
रंग बेरंगी पाना फुलांनी
नटली वसुंधरा नवलाईले

फुल उमलली कळ्यामधूनी
फुलपाखरांच्या मऊ स्पर्शानी
फुलता फुलता देती आनंद
सुगंध पसरवून सर्वांसाठी

निसर्गाच्या ह्या खेळामधूनी
इतकेच शिकावे मानवाने
स्वःतासाठी जगण्यापेक्षा
जगावे इतरांच्या सुखासाठी

Tuesday 11 March 2014

अंधारलेली वाट

0 comments

                       अंधारलेली वाट

अंधारलेल्या काळोख्या वाटेवर
शोधत होतो माझ्याच सावलीला
धडपडत होतो उगाचच अंधारात
स्वःताचेच अस्तित्व शोधायला

भुतकाळाच्या मिट्ट काळोखात
हरवून बसलो सुंदर आयुष्याला
दाखवील कोणी वाट प्रकाशाची
उगाच वाटत होते वेड्या मनाला

सुखाच्या मागे लागता लागता
दुःखाच्या च्छायेत वावरत गेलो
जगण्यासाठी लढण्या झगड्याचा
आत्मविश्वास मात्र हरवून बसलो

दाही दिशा वणवण फिरत राहिलो
जीवनातले संर्व रहस्य शोधायला
आयुष्यही अपूरे पडले मला मात्र
स्वःच स्वःतलाच ओळखायला

Thursday 20 February 2014

आठवणी

1 comments

                         आठवणी

जीवनातील खडतर प्रवासाला
आठवणी असतात  जोडीला
नात्यांच्या प्रेमळ गाठींना
महत्व आठवणींच्या धाग्याला

भूंतकाळातील आठवणींनी
स्वप्न रंगतात भविंष्यशाची
वर्तमानाच्या साथीने
पोटली भरते आठवणींची

प्रियजनांच्या अतूट प्रेमाने
रंग चढतो आठणींना
ऐकटेपणाच्या कठीण वेळेला
आठवणींच असतात जोडीला

जीवनाच्या आपल्या अंतानंतर
काहीच नसते बरोबर जोडीला
आठवणींच्या सुंदर रुपातच
सांभाळतो सर्वाच्या मनाला

Wednesday 19 February 2014

प्रश्न

0 comments

                        प्रश्न
प्रश्न तर सगळ्यांनाच पडतात
उत्तर मात्र काहीनांच मिळतात
प्रश्नानाही प्रश्न असतात
उत्तराशिवाय राहून जातात

प्रश्न तर पडलेच पाहिजेत
उत्तरासाठी धडपडलच पाहिजे
संसाराच्या दुचाकी गाडीला
प्रश्नांची चाक असलीच पाहिजे

शिक्षणाच्या जिवघेण्या दुनियेमध्ये
प्रश्न उत्तरांचा खेळ खेळलाच पाहिजे
यश मिळो वा अपयश मिळो
प्रयत्न तर करत राहिलत पाहिजे

जीवनात समंसेच्या निवारणेसाठी
प्रश्नानाच प्रश्न विचारले पाहिजेत
प्रयत्नाची पराकष्ट  करून
उत्तराच्या मुळापर्यत गेलेच पाहिजे

प्रश्नतर सगळ्यानांच पडतात
उत्तर मात्र काहिनाच मिळतात
प्रश्नानाही प्रश्न असतात
उत्तराशिवाय राहून जातात

Monday 17 February 2014

बोल

0 comments

                       बोल

मनामनाचे नाते जोडतात आपले बोल
आपल्यांना ही दुरावतात आंपलेच बोल
विचार करून बोलावे लागतात बोल
विचार करायला ही लावतात बोल
अबोल्यामंध्ये लपलेले अंसतात बोल
बोलण्यामंध्ये ही राहून जातात बोल
प्रेमात बूडवल्यावर मंधुर होतात बोल
रागात भान हंरपतात आंपलेच बोल
मायेशी सांगड घालतात जेव्हा बोल
आपुलकित ओलावा आंणतात बोल
मातापितांना सुखावतात बाळाचे बोबडे बोल
त्यांनाच दुखवतात मुलांचे उंर्मट बोल
मनातल्या बोलांना जेव्हा नंसते वाच्या
तेव्हा अंसते नूसतीच आशा

Friday 7 February 2014

माणूस

0 comments

               माणूस

जिवनात सर्व मिळून देखील
समाधानी मात्र कधीच नसतो
अंपूर्ण काही तरी राहिल्याच्या
जाणिवेत सतत वावरत असतो

पैसा अडका कमवून देखिल
समाधानापासून लांबच असतो
इतरांशी तुलना करता करता
दु:खात नेहमी बुडून असतो

मृगजळा मागे मागे पळताना
अस्तित्वालाच विसरून जातो
नको त्या व्यर्थ हंव्यासापाई
आयुष्यभर पळतच असतो

शिक्षणाच्या पदव्या घेऊन देखील
अशिक्षीतासारखा वागत असतो
अंधश्रध्येच्या जुनाट कल्पनेत
भरकटलेले जिवन जगत असतो

विचारांच्या वाद विवादात 
नेहमी सर्वांत पुढे असतो
आचरणाची वेळ येता मात्र
काढता पाय पहिला घेतो

देवाधंर्माच्या नावाखाली
लाखो करोडो उधळत असतो
गरिबाला रुपया देताना मात्र
दहा दहा वेळा विचार करतो

आयुष्याच्या सांजवेळी
एकटाच जीवन जगत असतो
माझ माझ म्हणण्यासारख
जोडीला अस काहीच नसत

प्रेम

0 comments

प्रेम म्हणजे प्रेम अंसते
सर्वांसाठी ते खुले अंसते
आईच्या मायेत ते दाटलेले अंसते
बाबांच्या रागात लंपलेल अंसते

प्रेम म्हणजे प्रेम अंसते
सर्वांसाठी ते खुले अंसते
तारुंण्यात ते आंकर्षण अंसते
उंतार वंयात ते आंधार अंसते

प्रेम म्हणजे प्रेम अंसते
सर्वांसाठी ते खुले अंसते
सफल झाले डोळस अंसते
असफल झाले कि आंधळे अंसते

प्रेम म्हणजे प्रेम अंसते
सर्वांसाठी ते खुले अंसते
साैदर्यावर करणारे खुप अंसतात
मंनावर करणारे मंहान असतात

Saturday 1 February 2014

समज गैरसमज

0 comments

  समज-गैरसमज
समज गैरसमज तर संर्वाचेच होतात
अनुभव मात्र वेगवेगळे येत असतात
आपले आपले वाटणारे परके होतात
परके वाटणारे जिंव्हाळ्याचे होतात‍
सुख म्हणून ज्याच्या मागे लागतो
प्रत्येक्षात मात्र मृगजळात असतो
आपले म्हणून ज्यांना ज्यांना पूजतो
संकट समई त्यांचा स्वभाव  कळतो
समज गैरसमज तर संर्वाचेच होतात
समजण्या पलीकडे ही माणस असतात
ओळखताना त्यांना चूका आपल्या होतात
समज झालेलस असतो आपला चांगला
पदरात पडते  फक्त निराशा आपल्या
समज गैरसमज तर संर्वाचेच होतात
प्रत्यक्षात मात्र वेगळे अनुभव येत असतात

Tuesday 28 January 2014

ताण तणाव

0 comments

                              ताण तणाव

      आधूनिक जगात मानवाचे जिवन इतके धावपळीचे आणि धगधगीचे झाले आहे की प्रत्तेक जण कसल्या  तरी कारणानी सतत धावतच असतो आणि काही तरी चिन्ता त्याला सतत सतावत असते.प्रत्येक वेळी तो विचारांचे ओझे घेऊनच वावरत असतो.
       पुर्वीच्या काळी फार कमी लाेकांच्या तोंडून तणाव  हा शंब्द एयकायला मिळायचा.त्या काळी लोकांच्या गरजा ह्या मर्यादीत होत्या.त्यांचे राहणीमा हे साधे होते.जसजसा काळ बदलत गेला तसतसे लोकांचा जगण्याचा दृष्टीकोनच बदलत गेला.पारंपरीक खाद्य,पेहराव,करमणूकीची साधने या मंध्ये लाक्षणिक बदल झाला आणि हे सर्व साध्य करण्यासाठी चालु झाली धावपळ,चढाओढ अन इथेच जन्मला आधूनिक जमान्यातला टेंन्शन रूपी राक्षस जो संर्वाच्या मानगुटीवर बसला आणि तो सगळ्यांना आपल्या तालावर नाचवत गेला.अगदी लहान शाळेतल्या मुलांनपासुन वयंस्कर व्यक्ती पर्यत संर्वानाच टेंन्शन असतात फक्त तीव्रता कमी जास्त असते.मुलांना ज्या वयात बालपणाचा आनंद उपभोगायचा असतो त्यावयात शाळेतून आणि पालकांकडून शैक्षणिक आणि तुलनात्मक स्पर्धेमंध्ये ढकलून दिले जाते.बालपणातच पाठी लागलेल टेंन्शन नंतर जणू जिवनसाथीच होते आणि बालपण संपण्यआधीच प्रोडावस्तेत जगणे चालु होते.
        आजच्या स्पर्ध्येमक जगात वावरताना आपण आपले अस्तित्वच विसरून गेलो आहे.पैसाच सर्वस्व झाल्यामुळे तो आणखीन कसा वाढवता यईल ह्याचाच विचार करत बसतो.नाते सबंध,माणूसकी ह्याचा विसर पडलेला दिसून येतो.
     शरीरावर पडलेला तणा हा मनामंध्ये तणाव नर्माण करतो आणि तो आपल्या जिवनाची घडीच विस्कटून टाकतो. देवाने दिलेल्या सुंदर शरीलाला टेन्शनची किड लागते आणि शरीरच पोखरून टाकते.जिवनातील खुपसे विचार हे विसरण्यासारखे असतात पण आपण नेमके ऊलट करुन ते कवटाळत बसतो.
     नोकरीत,संसार तसेच समाजात सतत तणावाखाली वावरत असतो आणि जिवनातील सुंदर अनुभवापासून वंचित राहतो.स्व:ताहून ओढऊन घेतलेल्या संकटाना सामोर जाण्यास आपण घाबरतो आणि आत्मविश्वासच गमऊन बसतो.ह्या क्षणाला आपण आपल्या आतला आवाज एयकाचा असतो पण आपण सुरु करतो ग्रह ता-यांचा खेळ, बाबा बुवा आणि जोतिचमष्यांच्या वा-या आणि उरल्या सुरल्या आयुष्याचा चुराडा करतो.
         जिवन हे खुप सुंदर आहे ते आनंदाने जगण्यातच मजा आहे.नाहक विचारांचे ओझे त्यावर टाकू न‍का.आपल्या आवाक्यात असतील तेव्हडेच विचार करा म्हणजे आपले जिवन सुखी होईल.
                             
                                                  सjay