Friday, 7 February 2014

माणूस

               माणूस

जिवनात सर्व मिळून देखील
समाधानी मात्र कधीच नसतो
अंपूर्ण काही तरी राहिल्याच्या
जाणिवेत सतत वावरत असतो

पैसा अडका कमवून देखिल
समाधानापासून लांबच असतो
इतरांशी तुलना करता करता
दु:खात नेहमी बुडून असतो

मृगजळा मागे मागे पळताना
अस्तित्वालाच विसरून जातो
नको त्या व्यर्थ हंव्यासापाई
आयुष्यभर पळतच असतो

शिक्षणाच्या पदव्या घेऊन देखील
अशिक्षीतासारखा वागत असतो
अंधश्रध्येच्या जुनाट कल्पनेत
भरकटलेले जिवन जगत असतो

विचारांच्या वाद विवादात 
नेहमी सर्वांत पुढे असतो
आचरणाची वेळ येता मात्र
काढता पाय पहिला घेतो

देवाधंर्माच्या नावाखाली
लाखो करोडो उधळत असतो
गरिबाला रुपया देताना मात्र
दहा दहा वेळा विचार करतो

आयुष्याच्या सांजवेळी
एकटाच जीवन जगत असतो
माझ माझ म्हणण्यासारख
जोडीला अस काहीच नसत

0 comments:

Post a Comment