Tuesday, 11 March 2014

अंधारलेली वाट

                       अंधारलेली वाट

अंधारलेल्या काळोख्या वाटेवर
शोधत होतो माझ्याच सावलीला
धडपडत होतो उगाचच अंधारात
स्वःताचेच अस्तित्व शोधायला

भुतकाळाच्या मिट्ट काळोखात
हरवून बसलो सुंदर आयुष्याला
दाखवील कोणी वाट प्रकाशाची
उगाच वाटत होते वेड्या मनाला

सुखाच्या मागे लागता लागता
दुःखाच्या च्छायेत वावरत गेलो
जगण्यासाठी लढण्या झगड्याचा
आत्मविश्वास मात्र हरवून बसलो

दाही दिशा वणवण फिरत राहिलो
जीवनातले संर्व रहस्य शोधायला
आयुष्यही अपूरे पडले मला मात्र
स्वःच स्वःतलाच ओळखायला

0 comments:

Post a Comment