बागेतील सायंकाळ
बागेमंध्ये एका सायंकाळी
सहज फेरफटका मारताना
पाहत होतो अनेक लोकांना
आमच्या भोवती वावरताना
लहान थोरांच्या त्या समुहात
तिन्ही पिड्यांचे दर्शन झाले
लहानपणा पासूनचे जीवन
डोळ्यासमोरुन तरंगत गेले
लहान मुलांच्या घोळक्यामंध्ये
मन सैरावैरा धावू लागले
बाल हट्टाचे निरागस ते दिवस
कळण्या आधिच सोडून गेले
तारूंण्यातील प्रमी युगलांना
पाहिले जेव्हा चोरुन लाजताना
दिसले झोपाळ्या विना झुलताना
संसाराचा गाडा दोघांनी ओढताना
वास्तवाचे लगेचच भान आले
काप-या आवजाच्या संभाषणाने
एक मेकांना आधार देत होते
आमच्यासारखे दुसरे जोडपे
बागेमंध्ये एका सायंकाळी
सहज फेरफटका मारताना. . . .
0 comments:
Post a Comment