आला वसंत
चाहूल लागताच वसंताची
कात टाकली निसर्गाने
जुनी पालवी गेली झडून
नविंन फुटली चैत्यन्यानी
वंड फुलले पिंपळ फुलले
आंबा मोहरला सुगंधाने
मकरंदाच्या वेडापायी
चालली लगबघ मधमाशांची
लाल पिवळे निळे गुलाबी
रंग उधळले सर्व दिशांनी
रंग बेरंगी पाना फुलांनी
नटली वसुंधरा नवलाईले
फुल उमलली कळ्यामधूनी
फुलपाखरांच्या मऊ स्पर्शानी
फुलता फुलता देती आनंद
सुगंध पसरवून सर्वांसाठी
निसर्गाच्या ह्या खेळामधूनी
इतकेच शिकावे मानवाने
स्वःतासाठी जगण्यापेक्षा
जगावे इतरांच्या सुखासाठी