पेशावर १६/१२
वेळ होती अजुन कळ्यांना उमलायला
पंख ही फूटले नव्हते त्यांच्या स्वप्नांना
काय अपराध होता चिमूकल्या जीवांचा
सामना करावा लागला दहशदवादाचा
वय होते त्यांचे खेळण्या बागडण्याचे
लपालपी अन चोर पोलिस खेळण्याचे
खोट्याखोट्या बंदूकीने खेळताखेळता
तांडव झाले मात्र ख-या खू-या गोळ्यांचे
पाट वाहत होते कोवळ्या रक्ताचे
आवज फक्त गोळ्या आणि रडण्याचे
रक्ताने माखलेला तो चिमुकला देह पाहुन
नाही पाझरले ह्वदय क्रूर दहशदवाद्यांचे
धर्माच्या नावानी दहशद पसरवणारे
विसरले विचार आपल्या आत्म्याचे
जीव घेऊन निष्पाप चिमुकल्यांचा
खून केला पवित्र माणूसकीचा
गोळ्या क्षणभर थांबल्या असतील
कोवळ्या देहास चिरत जाताना
काळीज कसे थरथरले नाही
दहशदवाद्यांना त्या चालवताना
देवा धर्माची ह्यांना भीती नसते
कोणीच ह्यांना नातलग नसतात
फक्त एकच अोळख असते ह्यांची
दहशदवादी दहशदवादी दहशदवादी. . . .