नात विचारांशी
एकदा ठरविले मनाशी
विचारांन शिवाय जगायचे
डोक्यातून अन मनातून
हद्दपार त्यांना करायचे
सकाळी सकाळी ठरवीले
डोक्यात विचार नाही आणायचे
डोळे ऊघडताच मनात आले
आज काय काय करायचे
दिवस भराच्या कामामंध्ये
केलेला संकल्प विसरुन गेलो
विचारांच्या नाजुक जाळ्यामंध्ये
नकळतच मी गुरफडत गेलो
तस म्हणल तर विचारांशी
नात आपल काहीच नसत
का कोणास ठाऊक आपण मात्र
त्यांच्या कोशात नेहमीच असतो
झोपेच्या कुशित शिरताना
विचारांचाच खेळ चालु होता
त्यांच्या शिवाय जगण्याचा विचार
ऊद्यावर ढकलला जात होते