पहिली भेट
सुर्यास्ताच्या रम्य संध्याकाळी
मावळतीला गुलाबी पसरलेली
रोमहर्षक अशा वातावरणात
तीची पहिली नजर भेट झाली
नजरा नजर ती क्षणिक होती
परी खुप काही सांगुन गेली
तीच्या डोळ्यातली ती चमक
ह्वदयच घायाळ करुनच गेली
मोकळे घनदाट तीच्या केसांना
बंधन नव्हते हवेशी खेळताना
कपाळावर झुलणा-या बटांतून
पाहिले तिला नजर चुकवताना
हळुच लाजत जेव्हा ती हसली
गालावर तीच्या खळी ऊमलली
मनात प्रितीची फुले फुलताना
ह्वदयाची मात्र धडधड वाढली
शब्द सुचत नव्हते बोलण्यासाठी
अबोलातच जुळत होत सर्वकाही
बोलण्याची काहीच गरज नव्हती
नजरच नजरेला सर्व सांगत होती