Saturday 7 March 2015

समाधान

0 comments

                            समाधान

समाधाना मागे धाऊन सुद्धा
असमाधानीच जगत होतो
कशामध्ये समाधान असत
काहीच केल्या समजत नव्हत

समाधानाने जगण्यासाठीच
दिवस रात्र राबत होतो
गरज नसलेले मिळवण्यासाठी
जिवनात सतत झगडत होतो

आनंद दुस-याला देण्यासारखे
आयुष्यात काही केलेच नाही
सुखासाठी सतत पळता पळता
थांबायचे भानच राहिलेच नाही

समाधान कशात असते ते मला
कान धरुन कोणी शिकवील का
पैशा पेक्षा मोठे कधिच नसते
समजवून कोणी सांगेल का. . .सांगेल का