न कळलेला देव
देवाची भक्ति कशी करावी
सांगेल का कोणी मजला
काय असे केले म्हणजे
भावेल तो माझ्या मनाला
देवस्तानाच्या वा-या करुन
खरच देव भेटतो का कधी
देव देव करणा-यांना तरी
सापडतो का त्या ठिकाणा
सोन्याच्या सिंहासनासाठी
देव करतो का हट्ट कधी
सोन अन रेशिम वस्त्रासाठी
येतो का तो आपल्या दारी
पंचपक्वांनाच्या नैव्यदाने
मन तृप्त होते का देवाचे
दान पेट्या तूडुंब भरल्यावर
समाधसन होते का भगवंताचे
नवसरुपी स्वार्थी आमिषाची
भूल पडते का त्याला कधी
सर्वाना भरभरुन देणा-यालाच
पडत असेल कधी काही कमी
देऊळात देव शोधणा-यांना
माणसांत का तो दिसत नाही
कर्मामधले त्याचे अस्तित्वामंध्ये
दिसेल का तो कधी........