सांजवेळ
एक सांजवेळ अशी ही असावी
मावळतीच्या सोनेरी सुर्यप्रकाशात
तुझी छाया माझ्या सावलीत लपावी
एक सांजवेळ अशी ही असावी
तुझ्या हृदयाची धडधध
माझ्या हृदयी ऐयकू यावी
एक सांजवेळ अशी ही असावी
धुंन्द माझ्या श्वासांच्या स्वरांना
तुझ्या मंम्द श्वासांची साथ असावी
एक सांजवेळ अशी ही असावी
भाव मनाचे स्पर्शाने अोळखाना
शब्द मात्र हंद्दपार असावे
एक सांजवेळ अशी ही असावी
बावरलेल्या तुझ्या डोळ्यांमंध्ये
स्वप्न माझी साकरताना दिसावी