समज-गैरसमज
समज गैरसमज तर संर्वाचेच होतात
अनुभव मात्र वेगवेगळे येत असतात
आपले आपले वाटणारे परके होतात
परके वाटणारे जिंव्हाळ्याचे होतात
सुख म्हणून ज्याच्या मागे लागतो
प्रत्येक्षात मात्र मृगजळात असतो
आपले म्हणून ज्यांना ज्यांना पूजतो
संकट समई त्यांचा स्वभाव कळतो
समज गैरसमज तर संर्वाचेच होतात
समजण्या पलीकडे ही माणस असतात
ओळखताना त्यांना चूका आपल्या होतात
समज झालेलस असतो आपला चांगला
पदरात पडते फक्त निराशा आपल्या
समज गैरसमज तर संर्वाचेच होतात
प्रत्यक्षात मात्र वेगळे अनुभव येत असतात
0 comments:
Post a Comment