असमाधनी
समाधानानी नेहमी जगण्याकरता
प्रत्येकजण धडपड करत असतो
समधानाचे समाधान होई पर्यत
पूर्ण जीवनच पणाला लावत असतो
समाधानाच्या फक्त नावाखाली
आपल्या गरजा वाढवत बसतो
मनाविरूद्ध एखादे घडताच काही
निराशेमध्ये स्व:ताला ढकलून देतो
इतरांन पेक्षा खुप कही जवळ असून
इतरांन पेक्षा कमीच समजत असतो
आहे त्यात समाधान मानण्या पेक्षा
असमाधानातच नेहमी वावरत असतो
सुखाच्या मागे सतत धावता धावता
समाधानाची ओळख विसरुन जातो
जवळच्या सर्व सुख सोयींना सोडून
दु:खाच्या विळख्यात गुरफडत जातो
समाधान आणि माणसाचे नाते हे
मृगजळातल्या पाण्यासारखे असते
वास्तवातील प्रत्यक्ष सुखांना सोडून
कल्पनेतल्या दुनियेत भरकटत असते
0 comments:
Post a Comment