संसार
संसार म्हणजे दोन जिवांचा मेळ
खेळावा लागतो मजेशीर खेळ
तूझे माझे करणारे होतात इथे बाद
समजदार पडतात एकमेकाच्या प्रेमात
कधी रुसवा तर कधी नाराजी
हिच संसारातील खरी ताजगी
संशयाला इथे नसतो थारा
विश्वासाला मान असतो मोठा
संसाराचा ताण दोघांना ही असतो
तकरारीचा सुर मात्र कोणाचाच नसतो
एकमेकांचा भार सांवरता सावरता
नकळत घट्ट होतो नात्यांचा जिव्हाळा
गोडी गुलाबीच्या या वातावर्णात
नकळत वर्ष जातात सरुन
जिवनातल्या उतरणीला
असतात एकमेकांचा हात धरुन
0 comments:
Post a Comment